शबाना आझमी यांची प्रकृती स्थिर; अवघं बॉलिवूड काळजीत


मुंबई: मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर खालापूर टोलनाक्याजवळ झालेल्या भीषण अपघातात जखमी झालेल्या ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांच्यावर वर्सावा येथील कोकिलाबेन धीरुभाई अंबानी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती आता स्थिर असल्याचे रुग्णालयाकडून सांगण्यात आले आहे.शबाना आझमी यांच्यावर कळंबोली येथील महात्मा गांधी रुग्णालयात (एमजीएम) उपचार सुरू होते. तिथून अधिक उपचारांसाठी त्यांना सायंकाळी सातच्या सुमारास मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात हलवण्यात आले. त्यांच्या तब्येतीबाबत रुग्णालयाचे कार्यकारी संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संतोश शेट्टी यांनी माहिती दिली असून शबाना यांची प्रकृती आता स्थिर असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. शबाना यांची प्रकृती स्थिर आहे व त्यांच्या प्रकृतीवर वैद्यकीय पथक लक्ष ठेवून आहे, असे शेट्टी यांनी नमूद केले.शबाना आझमी अपघातात जखमी झाल्यानंतर त्यांच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी सर्वच स्तरांतून प्रार्थना करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्रिटरच्या माध्यमातून शबाना यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली.


Popular posts from this blog

गरजूंना रोज २२०० अन्न पाकिटे पुरविणारे कोरोना योध्ये ठरताहेत पुण्यातील आदर्श

खळबळजनक ! लिफ्टच्या बहाण्याने 45 वर्षीय महिले बलात्कार करून लाखाचे दागिने लुटले, मुंढवा पोलीसांनी केले 24 तासात अटकु

खडकी शिक्षण संस्थेने नव्याने बांधलेल्या ‘स्व.चंद्रकांत मोहनलाल छाजेड सभागृहाचे उद्घाटन 14 मार्च रोजी