पणे मेटोच्या विस्तारास मंजरी बाजूला वाघोलीपर्यंत
पुणे : महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडून (महामेट्रो) राबवण्यात येणाऱ्या पुणे आणि पिंपरी-चिंचवड येथील दोन मार्गिका तसेच पुणे महानगर प्रदेश विकास प्राधि क र ण ा क डू न (पीएमआरडीए) करण्यात येणाऱ्या एक मार्गिका अशा तीन मार्गिकांच्या विस्तारीकरणाला उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी मंजुरी दिली. वनाजच्या बाजूला चांदणी चौकापर्यंत, रामवाडीच्या बाजूला वाघोलीपर्यंत, पिंपरीच्या बाजूला निगडीपर्यंत, तर स्वारगेटच्या बाजुला कात्रजपर्यंत असे नवे विस्तारित मागे राहणार आहेत. विस्तारित मार्ग राहणार आहेत. हिंजवडी ते शिवाजीनगर मार्ग हिंजवडीच्या बाजूला पिरंगुटपर्यंत वाढवण्यात येणार असून शिवाजीनगरपासून हडपसरमार्गे लोणी काळभोर-कदमवाक वस्तीपर्यंत पीएमआरडीएची मेट्रो धावेल.महामेट्रो आणि पीएमआरडीए यांच्या मेट्रो प्रकल्पांबाबतच्या आढावा बैठकीत उपमुख्यमंत्री पवार यांनी या सूचना केल्या. ते म्हणाले, वनाज ते रामवाडी मेट्रो मार्गिका वनाजच्या बाजूला चादणा वनाजच्या बाजूला चांदणी चौकापर्यंत आणि रामवाडीच्या बाजूला वाघोलीपर्यंत करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे ही मार्गिका वाघोली ते चांदणी चौक अशी होणार आहे. याबाबतचा प्रस्ताव मंत्रिमंडळाकडे आल्यानंतर मान्यता देण्यात येईल. तसेच पिंपरी ते स्वारगेट मार्गिकेचा पिंपरीच्या बाजूला निगडीपर्यंत आणि स्वारगेटच्या बाजला कात्रजपर्यंत विस्तार केला जाईल. पीएमआरडीएकडून हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गिका करण्यात येत आहे. या मार्गिकेचा हिंजवडीच्या बाजूला पिरंगुटपर्यंत आणि शिवाजीनगरपासून हडपसरमार्गे लोणी काळभोर कदमवाक वस कदमवाक वस्तीपर्यंत विस्तार होईल.