पै स्पोकन इंग्लिश अकॅडमी चे वार्षिक पारितोषिक वितरण
पुणे :महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या पी.ए.इनामदार अकॅडमी ऑफ स्पोकन इंग्लिशचा १३ वा वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा नुकताच पार पडला. महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ.पी.ए.इनामदार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.संस्थेच्या उपाध्यक्ष आबेदा इनामदार,सचिव डॉ.लतीफ मगदूम,अकॅडमीच्या संचालक रबाब खान,अकसा झैदी,तस्मिया शेख उपस्थित होते. यशस्वी विद्यार्थ्यांना पारितोषिके आणि प्रमाणपत्रे देण्यात आली. आझम कॅम्पस येथे नुकताच हा सोहळा पार पडला. २००९ पासून पुण्यातील मनपाच्या आणि आझम कॅम्पसच्या मिळून एकूण ७२ हजार विद्यार्थ्यांना इंग्रजी संभाषणाचे मोफत प्रशिक्षण दिल्याची माहिती यावेळी डॉ पी ए इनामदार यांनी दिली.२०१९ -२० या शैक्षणिक वर्षात ७ हजार विद्यार्थ्यांना इंग्रजी संभाषण प्रशिक्षण देण्यातआले.