खडकीत मराठी स्वाक्षरी मोहीमेचा कार्यक्रम
जागतिक मराठी राजभाषा दिनानिमित्त *शिव सेना* खडकी विभागाचे वतीने खडकीतील साहित्यिक व शिक्षक गुरुजनांचा सत्कार तसेच मराठी स्वाक्षरी मोहीमेचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून शिवाजी नगर गटप्रमुख समन्वयक विश्वासराव चव्हाण याच्या व ज्येष्ठ शिवसैनिक तुलसीराम आहेर, मोहन आहेर,व विभाग प्रमुख रविन्द्र सोनावणे, महिला उपसंघटिका वृशाली पवार यांच्या हस्ते . या कार्यक्रमात साहित्यिक व शिक्षक नितीन शिदे, अनिल पाटील, सोपान गौंटला, अतुल जाधव, प्रविण इंगवले, मोहन चार्य यांच्या शाल, श्रीफल व गौरव सन्मान पत्र देऊन सत्कार करण्यात आला. सुत्रसंचालन उपविभाग प्रमुख राजेश काकडे यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी खडकी शिव जयंतीचे अध्यक्ष शिवाजी पवार, मोहन गवली, अशोक सिरसाठ,विकी सारसर, मदन गाडे, शाखा प्रमुख उत्तम रास्ते, महेश पुहाल,कैलास गोयर,प्रकाश चवरे,हेमंत यादव, अजय जेधे,करून चव्हाण,पवन लखन यांनी परिश्रम घेतले. समस्त खडकीकरानी स्वाक्षरी मोहिमेत मराठीत स्वाक्षरी करून भाग घेतला.