खडकी मध्ये शिवसेनेचे करोना व्हायरसला आळा घालण्याकरीता स्वच्छता अभियान
खडकी : खडकी विभागातील शिवसेनेचे सर्व पदाधिकारी ..शिवसैनिक ..महिला आघाडी , कॅन्टोन्मेंट सफाई कर्मचारी , आधार फाऊंडेशन चे कर्मचारी यांच्या संयुक्त विद्यमाने ..खडकी बाजारपेठ परिसर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाभवतालचा सर्व परिसर स्वच्छ करण्यात आला ..शिवसेनेचे खडकी स्वच्छ व सुंदर करण्यासाठी नेहमीच एक पाऊल पुढे असते ....खडकी च्या नागरिकांनी आपला परिसर स्वतःहुन स्वच्छ करुन ...करोना व्हायरस ला हद्दपार करावे ..असे आहवान शिवसेना खडकी तर्फे नागरिकांना करण्यात आले .... याप्रसंगी शिवसेनेचे शिवाजीनगर गटप्रमुख समन्यक विश्वास चव्हाण , विभागप्रमुख रवी सोनवणे , उपविभागप्रमुख राजेश काकडे , जेष्ठ शिवसैनिक तुळशीराम आहेर , मोहन गवळी , राजन नायर , शिवजयंती अध्यक्ष शिवाजी पवार , महिला आघाडी विभाग संघटिका आशा आहेर , उप विभाग संघटिका रुशाली पवार , शाखा संघटीका संगीता सोनवणे , व महिला कार्यकर्ते तसेच शाखाप्रमुख उत्तम रास्ते , प्रकाश चौरे , महेश पुहाल , शुभम पाटोळे , बबलु पिल्ले , विक्कि सारसर , करन चव्हाण , अशोक शिरसाठ , आणि बहुसंख्य शिवसैनिक उपस्थित होते ..