पुणे येथे बँक ऑफ महाराष्‍ट्रतर्फे टाऊन हॉल मेळाव्‍याचे आयोजन


पुणे,  : बँक ऑफ महाराष्‍ट्रच्‍या पुणे शहर, पुणे पश्चिम आणि पुणे पूर्व विभागांनी एकत्रितरीत्‍या 6 मार्च 2020 रोजी “टाऊन हॉल” मेळाव्‍याचे आयोजन केले होते. या मेळाव्‍याचे घोषवाक्‍य ‘कनेक्‍ट: मॅनेजमेंट बाय पॅशन, मॅनेजमेंट बाय कम्‍पेशन.’ असे होते॰ या  विभागाअंतर्गत 192 शाखा आणि प्रशासकीय कार्यालयातील सुमारे 700 कर्मचा-यांनी मेळाव्‍यात भाग घेतला. बँकेचे व्‍यवस्‍थापकीय संचालक व प्रमुख कार्यकारी अधिकारी श्री. ए. एस. राजीव, कार्यकारी संचालक श्री. हेमंत टम्‍टा, महाप्रबंधक – मानव संसाधन व्‍यवस्‍थापन डॉ. एन. मुनीराजू, महाप्रबंधक व पुणे शहर विभाग प्रमुख श्री. पी. आर. खटावकर, विभागीय व्‍यवस्‍थापक – पुणे पूर्व विभाग श्री. एच. ए. माझिरे आणि विभागीय व्‍यवस्‍थापक – पुणे पश्चिम विभाग श्री. पी. के. दास या मेळाव्‍यात उपस्थित होते.


आपल्‍या भाषणात व्‍यवस्‍थापकीय संचालक व प्रमुख कार्यकारी अधिकारी श्री. ए. एस. राजीव यांनी आव्हान केले की सर्व कर्मचार्‍यांना ग्राहकांशी संबंध दुढ केले पाहिजेत. त्‍यासाठी तंत्रज्ञानाला व्‍यक्तिगत संपर्काची जोड द्यावी लागेल. आपल्‍याला ग्राहकांना बँकेच्‍या डिजिटल कार्यपद्धतीकडे वळविले पाहिजे. त्‍यामुळे ग्राहकांना अधिक चांगला अनुभव मिळेल आणि शाखांना व्‍यवसायवृद्धिसाठी अधिक वेळ मिळेल.


श्री. राजीव यांनी संबोधनात पुढे संगितले की पुण्‍याच्‍या विभागांची कामगिरी बँकेच्‍या वाढीत महत्‍वाची आहे. बँकेचे पुण्‍यातील हे तीन विभाग एकूण व्‍यवसायाच्‍या 15% वाटा उचलून महत्‍वाची भूमिका पार पाडतात.


कार्यकारी संचालक श्री. हेमंत टम्‍टा यांनी कर्मचा-यांना बँकेच्‍या व्‍यवसायवृद्धीसाठी योगदान देण्याचे आवाहन केले. गेल्‍या चार तिमाहीमधे बँकेने आपले सामर्थ्‍य, जोमदार वाढ आणि अडचणींवर मात करण्‍याची क्षमता ही नफ्यासह इतर सर्व निकषांवरही दाखविली आहे.


श्री. टम्‍टा यांनी ग्राहकमैत्रीसाठी शाखांना स्‍थानिक भाषा वापरण्‍याचे आवाहन केले. ते म्‍हणाले की सर्व स्तरातील कर्मचा-यांनी आपल्या मातृ संस्थेच्या सर्वांगीण विकासासाठी एकत्रित येऊन हातभार लावल्यास या मेळाव्‍याच्या आयोजनाची पूर्तता होईल . 


डॉ. मुनीराजू, महाप्रबंधक ,मानव संसाधन व्‍यवस्‍थापन यांनी सांगितले की उत्‍पादन आणि सेवा यांचे ज्ञान, सेवेचा वेग,नम्रतेसह सस्मित सेवा आणि  वेळेचे पालन हे ग्राहक सेवेचे घटक आहेत. डॉ. मुनीराजू यांनी जाहीर आवाहन केले की आता बँकेची अधिक वेगाने प्रगती होण्यासाठी प्रत्‍येक कर्मचा-याने सकारात्‍मक योगदान द्यावे .


श्री. पी. आर. खटावकर, महाप्रबंधक आणि विभाग प्रमुख - पुणे शहर विभाग यांनी सर्व                 कर्मचा-यांना पुण्‍यातील तीन विभागांचे महत्‍व आणि बँकेच्‍या व्‍यवसायातील पुणे जिल्हयाचे  योगदान याची माहिती दिली. पुण्‍यामध्‍ये बँक ऑफ महाराष्‍ट्रचे सर्वाधिक अस्तित्व आहे आणि त्‍याचे प्रतिबिंब व्‍यवसायात दिसण्‍यासाठी सर्व कर्मचा-यांनी प्रयत्‍न केले पाहिजेत असेही त्यांनी पुढे स्पष्ट केले.


ईएएसई (EASE) याबाबत माहितीचा व्हिडिओ सर्व उपस्थितांना दाखविण्‍यात आला. 
आय बी ए द्वारा नवी दिल्ली येथे दिनांक 26 फेब्रुवारी 2020 रोजी आयोजित ईज-3.0 अनावरण समारंभ संपन्न झाला या कार्यक्रमात “शीर्षस्थानी असणारे आघाडीचे सुधारक” अर्थात ‘फ्रंट-रनर्स इन टॉप इम्प्रूवर्स’ या श्रेणीमध्ये बँक ऑफ महाराष्ट्र सर्वद्वितीय ठरली आहे.
    


Popular posts from this blog

गरजूंना रोज २२०० अन्न पाकिटे पुरविणारे कोरोना योध्ये ठरताहेत पुण्यातील आदर्श

खळबळजनक ! लिफ्टच्या बहाण्याने 45 वर्षीय महिले बलात्कार करून लाखाचे दागिने लुटले, मुंढवा पोलीसांनी केले 24 तासात अटकु

खडकी शिक्षण संस्थेने नव्याने बांधलेल्या ‘स्व.चंद्रकांत मोहनलाल छाजेड सभागृहाचे उद्घाटन 14 मार्च रोजी